🥰🌹🥰🌹🥰🌹🥰🌹
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
_*वेळ मिळत नाही अशी कारणे सांगूनही काही जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण गमावतात.*_
_*’आयुष्य’ हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जातं. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होतो…!*_
_*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती..!*_
_*जबाबदारीची जाणीव असुन नुसत भागत नाही, ती पेलण्याचे सामर्थ्य हि असावं लागतं. आयुष्य हे एखाद्या मडक्यासारखं असतं. आकार बिघडला की मडकं बिघडतं.. त्याप्रमाणे माणसाच पाऊल चुकीच्या वळणावर पडलं की, माणूस बिघडतो. म्हणून कधीच आयुष्य बिघडणार नाही याची काळजी घ्या..!*_
_*आनंदाचा सर्वात मोठा भाग आपल्या स्वभावावर अवलंबून असतो, आपल्या परिस्थितीवर नाही. आपल्या वाटेत कोणी खड्डा खणला म्हणून नाराज होऊ नये कारण तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
***********************
*प्रा डॉ विजय गाढे*
*मुख्य संपादक,करडी नजर न्यूज*
●◆◆◆◆◆★★★◆◆◆◆●