अमळनेर प्रतिनिधी, वर्षभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यात लैंगिक गैरसमज निर्माण झाल्याने महिनाभरात मुलीने सासर सोडले.
समाजात नकारात्मक चर्चा झाल्याने एका तरुणाचे आयुष उद्धवस्त होऊ घातले असताना अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीने दोघांतील अज्ञान दूर करून दोघांना एकत्र आणल्याने समितीचे कौतुक होत आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने पत्नी अनिता( नाव बदलले आहे) विवाह पश्चात महिनाभरात माहेरी निघून आली व किशोर ची परिवारात बदनामी झाली.
किशोरचे आयुष्य उध्वस्त होणारी घटना असल्याने त्याने थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांचे पर्यंत आला. त्यांनी सहकारी व वैद्यकीय तज्ज्ञाची मदत घेत पती-पत्नी तसेच दोन्ही कुटुंबातील लोकांचे समुपदेशन केले. मेडिकल रिपोर्ट व किशोर-अनिता गैरसमज दूर होऊन दोघांतील दुरावा मिटवला.
विवाह पश्चात महिनाभरात दुभंगलेल्या संसाराची वर्षभरात पुन्हा नाळ जुळली. लैंगिक शिक्षणाचा अभाव असलेल्या या दोघांना पुन्हा आनंदाने संसारात रममाण होताना पाहून उपस्थित पंच व नातलगानी अज्ञानाचे जाळे दूर केल्या बद्दल दोन्ही परिवारातील सदस्यांनी महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, विनोद राऊळ, बाळकृष्ण शिंदे, निशा विसपुते, वैशाली सोनार,मंगला विसपुते,विनोद सोनवणे, अनिल चौधरी,राजकुमार कोराणी यांचे आभार मानले.
महीला अन्याय विरोधी समितीने या पूर्वी असंख्य संसार जोडण्याचे काम केले आहे हे विशेष.