अमळनेर प्रतिनिधी,येथील एल आय सी कॉलनीतील विद्या(नाव बदलले आहे) सुरत येथील कल्पेश सोबत अवघ्या तीन महिन्यापूर्वी विवाहित झाली होती. दोघांचे हा दुसरा विवाह असून देखील किरकोळ कारणाने अवघ्या तीन महिन्यात वितुष्ट निर्माण झाल्यानें महिला अन्याय विरोधी समितीने यात पुढाकार घेऊन समुपदेशन केले.12 वर्षीय मुलास पुन्हा हक्काचे घर मिळाले.
कल्पेश विद्या व कुमार यास घेऊन सुरत कडे रवाना होत असताना भावुक वातावरण निर्माण झाले होते.कल्पेश व विद्याचे नातलग या वेळी उपस्थित होते.
सामाजिक दातृत्व स्वीकारलेल्या महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, विनोद राऊळ, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, राजकुमार कोराणी, ऍड शैलेश बागुल, प्रवीण दुसाने यांनी या कामी पुढाकार घेऊन एक दुभंगलेला संसार पुन्हा साधंला.
महिला अन्याय विरोधी समितीने महिनाभरात तिसरा संसार उभा केल्याने समिती सदस्यांBचे कौतुक केले जात आहे.