सर्व नागरी घटकांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे व १ ऑक्टोबर रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराने १९ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदवावे – प्रांत अधिकारी नितीन मुंडेवार 

अमळनेर प्रतिनिधी,राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वत्र आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असल्याने सर्व नागरी घटकांनी त्याचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे व एक ऑक्टोबर २०२४ पर्यति १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराने १९ ऑक्टोबर पर्यत अर्ज केल्यास त्याला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार असल्याचे काल झालेल्या पत्रकार परिषदेत अंमळनेर येथे नव्याने रुजू झालेले प्रांतधिकारी नितीन मुंडेवार यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक जाहीर झाल्याने शासकीय यंत्रणा सजग झाली.महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.मागील अंमळनेर विधानसभा निवडणुक प्रंचड गाजली.आरोप प्रत्यारोप सह हल्ले करण्यात आले.यामुळे सदर विधानसभा क्षेत्र अधिक सेन्सिटिव्ह झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर अंमळनेर उपविभागीयअधिकारी नितीन मुंडावरे यांनी काल आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यात त्यांनी नागरीकांना आवाहन केले की,येणारी निवडणूक ही अतिशय शांततेत व भय मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करावे.तसेच निवडणूक प्रक्रिया बाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की,यंद्या पाच मतदान केंद्र वाढली, १३ हजार ७२८ मतदार वाढले.अमळनेर विधानसभा मतदार संघात १ लाख ५६ हजार ९८० पुरुष मतदार आहेत. गेल्या वेळेपेक्षा ५ हजार २२९ पुरुष मतदार वाढले. तर १ लाख ४९ हजार ३८७ स्त्री मतदार आहेत म्हणजे ८ हजार ५०२ स्त्री मतदार वाढले. तसेच इतर ३ असे एकूण ३ लाख६ हजार ३७० मतदार आहेत.एकूण १३ हजार ७२८ मतदार वाढले . अमळनेर शहरात ८३,ग्रामीण भागात १९०, तर पारोळा ग्रामीण भागात ५२ असे एकूण ३२५ मतदान केंद्र आहेत. गेल्या वेळेपेक्षा पाच मतदान केंद्र वाढली आहेत. त्यात परदानशीन म्हणजे तोंडावर पडदा असलेले मतदार असणारे ४७ केंद्र आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेले ३ हजार ८८७ तर शारीरिक दृष्ट्या दुर्बल असे एकूण २ हजार ३१८ मतदार आहेत. अशा मतदारांसाठी घरीच मतदानाची सोय केली जाणार आहे. त्यांना फक्त दोनवेळा संधी दिली जाईल.तसेच अकरा विशेष केंद्रे.विशेष केंद्रची संख्या ११ असून त्यात एन टी मुंदडा ग्लोबल , नगरपालिका, डी आर कन्याशाळाही तीन केंद्रे महिला केंद्रे असणार आहेत. यात सर्व कर्मचारी महिला असतील. सरस्वती विद्या मंदिरात युवा मतदान केंद्र असेल तर सानेगुरुजी माथ्यमिक विद्यालय व जी एस हायस्कूल मध्ये दिव्यांग मतदान केंद्रे असतील त्याठिकाणी सर्व दिव्यांग कर्मचारी नियुक्त असतील. तर गोल्डन विंगस स्कूल नवीन मराठी शाळा, जिप शाळा मंगरूळ, जिप शाळा कळमसरे, जिप शाळा जवखेडे ही पाच केंद्रे आदर्श असतील.१६३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग द्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच निवडणुकीवर नियंत्रणासाठी ३ एफएसटी पथक , ३ एसएसटी पथक ,३ व्हिएसटी पथक तर २ व्हीव्हीटी पथक व ३४ +३ सेक्टर अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत.मतदान केंद्रांवर ३५८ केंद्राध्यक्ष , तसेच प्रत्येकी३ ५८ प्रथम, द्वितीय आणि तृतीय अधिकारी व ३५८ शिपाई असे एकूण १७९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ३९० कंट्रोल युनिट, ३९० बॅलेट युनिट आणि ४२३ व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आले आहेत.तसेच यंदा साहित्य वाटप आणि मतमोजणी टाकरखेडा रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी पत्रकार परिषदेस तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे,प्रशांत ढमके हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!