पारोळा प्रतिनिधी, येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त तथा नवीन शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागात कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. काकसो वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी दादासो रोहन मोरे, संचालक दादासो पराग मोरे, प्राचार्य बापूसो डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, प्रा. पी. पी. पाटील तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.