परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होत जनताच खेचणार डॉ. शिंदेच्या विजयाचा रथ.
पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे यांनी सहभागी होत भगवान बद्रीनारायणाचे आशीर्वाद घेतले.
तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे प्रचारार्थ सर्व नेते व कार्यकर्त्यांनी तालुका पिंजून काढला असून तालुक्यात परिवर्तनाची लाट आल्याचे बोलले जाऊ लागले आहे. १४ रोजी बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात डॉ. अनिल शिंदे तसेच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी रथोत्सवात रथ ओढण्याचा मान डॉ. शिंदे यांना मिळाला. अंगी मग्रुरी नसलेला साधा माणूस म्हणून मतदारसंघातून डॉ. शिंदे यांना भक्तांनी मोठा प्रतिसाद देऊन विजयाचा कौल दिला आहे. आता परिवर्तनाच्या लाटेत सहभागी झालेली तालुक्यातील जनताच डॉ. शिंदेच्या विजयाचा रथ खेचणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.