अमळनेर प्रतिनिधी,येथील मौजे तरवाडे येथील मागास वस्ती मधील गंभीर समस्या सोडवण्यात याव्या म्हणून आठवले गट चे अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत बैसाणे व शहराध्यक्ष एड.अभिजीत बिऱ्हाडे सह आरपीआयचे कार्यकर्ते व समस्त तरवाडे येथील मागास वर्गीय दलित समाज यांनी उपोषण केले.
तरवाडे येथील रहिवाशी सुमारे 07 वर्षा अगोदर पासुन गावाबाहेर सुमारे 1 किलो मिटरच्या अंतरावर घरकुल देण्यात आले आहेत.सदरचे घरकुल बांधून व रहिवास होवून जवळपास ७ वर्ष होण्यात आलेले आहेत. परंतू आजपावेतो हेतुपुरस्कर मागासवर्गीय रहिवाश्यांना सदरच्या विकाणी विद्युत पुरवठा, रस्ते, पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.घरात लाईट नाही तसेच रस्त्यावर देखील लाईट नसल्याने त्या ठिकाणी खुप मोठया प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असते व पावसाळयांमध्ये घराचे बाहेर निघणे देखील खुप अडचणीचे होत आहे .रस्ता नसल्याकारणाने वापरच्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य आहे .त्यामुळे सदर वस्तीतील नागरिकांना बऱ्याच वर्षापासुन रोग राईला तसेच विषारी जन जनवरांचे सामोरे जावे लागत आहे.तसेच बऱ्याच वर्षापासुन संबंधीत ग्रामपंचायतीने पिण्याचे पाण्याची देखील व्यवस्था करुन दिली नसल्या कारणे दररोज किमान 3 किलो मिटर अंतर पायी चालून पिण्याचे पाणी आणावे लागते. तसेच आमचे लहान लहान निष्पाप मुलांना शाळेत जातांना पायी एक एक किलोमिटर चिखलातून जावे लागत आहे . निष्पाप मुलांच्या शिक्षणावर देखील दुषपरिणाम होत आहेत व त्यांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे यावरुन असे लक्षात येते की, संबंधीत ग्रामपंचायत मधील शासकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी व सदस्य हे निव्वळ सदर वस्ती ही दलित असल्याने हेतुपुरस्कर अन्याय करीत असल्याची भावना उपोषण करते ग्रामस्थांची आहे .
*उपोषण कर्त्यांचा प्रशासनाला इशारा…*
तरी रहिवासाच्या ठिकाणी तात्काळ लाईट, गटारी, रस्ते, व पाणी उपलब्ध न केल्यास समस्त अन्याय ग्रस्त दलित बांधव दिनांक 15/08/ 2024 रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब, अमळनेर यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसलो आहोत. याच्या होणाऱ्या परिणामास संबंधीत ग्रामपंचायत हि जबाबदार राहील याची तातडीने दखल घ्यावी,असा इशारा देण्यात आला.
*आमरण उपोषणाच्या प्रमुख मागणी*
शासनामार्फत सन 2017 ते आजपावेतो सदर ग्रामपंचायतीला शासनामार्फत दलित वस्तीसाठी वा इतर कामासाठी आलेल्या संपुर्ण निंधीची व सदर निधी खर्च केल्याची तात्काळ चौकशी होवून संबंधीतावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.तात्काळ आम्हास रस्ते, गटारी, व लाईट, पिण्याचे पाणी उपलध करून दयावे.
या प्रसंगी प्रवीण कांतीलाल पाटील,रवींद्र वाघ,देविदास वाघ ,सोमा भिल,लहूं बोरसे,रमेश वाघ, राज वाघ,अनिल वाघ,सरला भिल, मनुबाई भिल, यशाबाई भिल आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.