अमळनेर प्रतिनिधी,येथील कै. नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा.डॉ.देवदत्त पाटील यांनी केले.प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. देवदत्त पाटील यांनी सर्व खेळांविषयी सविस्तर माहिती दिली, या कार्यक्रमाचे उद्घाटक तुलजेस पाटील कांस्यपदक विजेता अखिल भारतीय क्रिकेट विद्यापीठ स्तर खेळाडू यांच्या हस्ते करण्यात आले. या दिवशी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला,मा. प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच हॉकीपटू ध्यानचंद यांच्या विषयी संपूर्ण जीवनपट सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी मानले.
या राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच खेळाडू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.