अमळनेर प्रतिनिधी ,येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉ.अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंन तसेच कुबेर ग्रुपचे मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून लोकार्पण प्रसंगी रवि पाटील, महेंद्र महाजन सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील वाढती गुन्हेगारीला महत्वपूर्ण कारण म्हणजे अमळनेर पोलिस ठाण्यातील अपुरे पोलिस कर्मचारी संख्या होय. दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे.त्यात सदर चे शहर हे रेल्वेने जोडलेले असल्याने व्यापारी वर्गाचे महत्वपूर्ण ठिकाण बनले आहे. शैक्षणिक दृष्टीकोनातून विचार केला असता शहरात अनेक शाळा महाविद्यालयात शिकायला मुल मुली हे येत असतात.तसेच वाढती बेरोजगारी पाहता अनेक तरुण व्यसनाधीन होत असून गुन्हेगारी कडे वळताना दिसत आहे.खून,दरोडे सह चोऱ्या मारमारीचे प्रमाण ही गेल्या चार पाच वर्षापूर्वी उच्च कोटीला पोहचले होते.मात्र तत्कालीन उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी शक्कल लढवून लोकवर्गणीतून शहरात ठीक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची चंगच बांधला आणि त्याचा परिणाम हा गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात दिसून आला.संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या टप्प्यात आले.लोकांना सी सी टी व्ही कॅमेरेचे महत्व पटू लागले आहे.त्याचा भाग म्हणून शहरातील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात प्रख्यात सर्जन व समाजभान असलेले डॉ.अनिल शिंदे,नर्मदा फॉउंडेशंन तसेच कुबेर ग्रुपचे मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले.या प्रसंगी अनेक नागरिक उपस्थित होते.