अमळनेर प्रतिनिधी , येथील अमळनेर विधानसभा मतदार संघ हा पारंपारिक काँग्रेसचाच असून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस चे मनोज पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस देखील आग्रही असून त्यासाठी दि 2 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत काँग्रेस चे तालुकाध्यक्ष यांनी सांगितले की येत्या 5 सप्टेंबर ला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षते खाली बूथ प्रमुखाचा मेळावा घेण्यात येणार असून सर्व बूथ प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना मनोज पाटील यांनी सांगितले की अमळनेर हा काँग्रेसचाच पारंपारिक मतदारसंघ आहे.आम्ही राष्ट्रवादीच्या विनंती मान देऊन व आमच्या सक्षम उमेदवार नसल्याने तात्पुरते ही जागा त्यांना दिली होती.आता आम्ही सक्षम आहोत.त्यामुळे तालुक्यातून तब्बल पाच ते सहा इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठी कडे अर्ज दाखल केले आहे.यापैकी तीन जणांनी जिल्हाध्यक्ष मार्फत प्रदेश कार्यालयाकडे पाठविले आहे.उर्वरित दोन जणांनी थेट प्रदेश कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे.मात्र त्यांनी तालुका अध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष यांना विश्वासात घेतले नाही.
तालुका अध्यक्ष बी के सुर्यवंशी यांनी सांगितले की,पक्ष श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करणार व निवडून आणणारच.
यावेळी विधानसभेला इच्छुक उमेदवार यांनी आपले व्हिजन स्पष्ट करतांना सुलोचना वाघ म्हणाल्या की, मी शेतकरी व युवक यांच्या साठी काम करेल, महिलांना संरक्षण देण्याबाबत लक्ष देईल तसेच महिला सक्षमीकरण करेल.यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की,तालुक्यात आपल्या महिला संघटनेत किती महिला आहेत तर त्याला उत्तर देताना सांगितले की एकूण 100 महिला आहेत.
तसेच दुसरे इच्छुक उमेदवार के डी पाटील म्हणाले की,पाडळसरे धारण पूर्ण करणे, बेरोजगारी कमी करणे साठी उद्योग धंदे सुरु करणे,सामाजिक सलोखा निर्माण करणे हा माझा उद्देश आहे.राजकारणाचा गाढा अनुभवाचा फायदा हा तालुक्याच्या विकासासाठी करणार.
तिसरे इच्छुक उमेदवार संदीप घोरपडे म्हणाले की,उपसा सिंचन योजना,पिकपेरा स्थापना करेल,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव व आदर्श गाव योजना सुरू करणे,जुनी पेन्शन योजना साठी प्रयत्न करेल.याप्रसंगी ते जमा करीत असलेल्या दहा रुपये तिकीट नमिळाल्यास परत करण्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
दरम्यान पत्रकारांनी डॉ अनिल शिंदे व किसांन सेल चे प्रा सुभाष पाटील यांना या पत्रकार परिषदेत का बोलविले नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना मनोज पाटील यांनी सांगितले की आम्ही त्यांना बोलावले होते ते आले नाही.ते राष्ट्रवादीच्या बैठकीला जातात.तर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांनी सांगितले की डॉ अनिल शिंदे व प्रा सुभाष पाटील हे पक्षाचा प्रोटोकॉल पाळत नाही. त्यांची तक्रार आम्हीं वरिष्ठांना कळविले आहे.
याबाबत डॉ अनिल शिंदे व प्रा सुभाष पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला त्यांनी बोलवले नाही.ते खोटे बोलत आहेत.वाटल्यास आमचा व त्यांचा कॉल रेकॉर्ड तपासा.”पाणी का पाणी ओर दूध का दूध हो जायेगा.”
यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष डी डी पाटील, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ प्रा नयना पाटील आदी उपस्थित होते.