दिंडोरी प्रतिनिधी,नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपाचा नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी रामोळे रुग्णालयाच्यावतीने राबवलेला उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे गोरगरीब रुग्णांना लाभ मिळाला आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केले.
दिंडोरी येथे रविवार दि.१५ रोजी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रामोळे आय हॉस्पिटल नेत्रम आय सेंटर व नगरसेवक नितीन गांगुर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले त्यावेळी बापू चव्हाण बोलत होते. या शिबिरांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करून जवळपास १७० नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेऊन नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉक्टर भागवत कुंभार, अंकिता वाबळे,ओम शिलेदार,श्याम सोनवणे,शुभम थोरात,संकेत कोरडे, हर्षला गांगुर्डे,मिरज रोतला,संदीप नेगी,आदींनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण शांताराम जाधव,हरिभाऊ चारोस्कर, मनोज पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. कोरडे यांनी सांगितले की डोळे आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याची वेळीच काळजी घेतली पाहिजे. याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.