नवलनगर महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेला मोठया उत्साहात सुरुवात… 

धूळे प्रतिनिधी, येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यार्थी विकास विभाग क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय नवलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसाची आत्मनिर्भर युवती कार्यशाळेचे आयोजन दिनांक 27 09/2024 तारखेपासून ते दिनांक 4/10/2024 असे करण्यात आले आहे.या कार्यशाळेत कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती प्रशांत खैरनार,सायबर गुन्हे संबंधी माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी, मा. प्रवीण बी. खैरनार, तसेच बँक मॅनेजर माननीय श्री मनीष जी बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी म्हसदी महाविद्यालय प्रा. डॉ. व्ही. के.साळुंखे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दररोज या कार्यशाळे अंतर्गत मार्गदर्शन होणार आहे.

पहिले पुष्प आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला गुंफण्यात आले. त्यातील पहिल्या दिवसाचे उद्घाटनाचे व प्रथम पुष्प ..’उद्योजकता व युवकांसाठी असलेल्या संधी’ या विषयावर धुळे येथील मिटकॉन जिल्हा उद्योग केंद्र समन्वयक मा. श्री प्रमोदजी महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय उभाळे ,तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रा.डॉ.सुजाता आ .निकम व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.यु.वाय. गांगुर्डे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी दीपप्रज्वलन प्रास्ताविक सूत्र संचालनाची जबाबदारी प्रा. एस.डी .सूर्यवंशी यांनी चोखपणे निभावली .या कार्यक्रमांतर्गत प्रमोदजी महाजन यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या स्तरावर कोणकोणत्या योजना आहेत व त्या योजनांसाठी आपण काय केले पाहिजे. ग्रामीण भागातील एकूणच महाविद्यालयीन उच्चशिक्षित तरुण-तरुणी यांनी व्यवसायाची कास धरून आत्मनिर्भर व्हावे. प्रत्येकाच्या खिशात पैसा खेळता राहिला म्हणजे अनेक समस्या आपोआप सुटतात. म्हणून लाडका भाऊ, लाडकी बहीण, लखोपती दीदी अशा अनेक विविध योजनांचे विवेचन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्हि.एच .उभाळे आपल्या मनोगतात विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी उद्योजकाकडे वळण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे ,असा मोलाचा संदेश दिला.

आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये कु. वर्षा सोनवणे व संदीप काळू वाघ या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय क्रॉस कंट्री मध्ये खेळण्यासाठी पात्र झाल्याबद्दल. मा. प्रमोद महाजन व प्राचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशाचे खरे मानकरी शारीरिक शिक्षक शिक्षण संचालक प्रा. विजय बी. शिंदे यांचां प्रा. डॉ. के.डी .बागुल यांनी अभिनंदन व सत्कार केला .महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले .

या कार्यक्रम प्रसंगी पालक वर्गातून बाळापूर येथील ह भ प रावसाहेब केदारे, ज्येष्ठ प्रा. डॉ. एन.झेड. पाटील प्रा. डॉ. एस. जे पाटील, प्रा. डॉ. ए.बी. सोनवणे , प्रा.डॉ . एस.के.कदम प्रा. डॉ. के.डी.बागुल .प्रा. विजय शिंदे ,प्रा. पराग बोरसे, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. सौ. छाया पाटील तसेच श्री.संभाजी पाटील, श्री. रविंद्र धनगर, सौ.पूनम चौधरी, श्री रोहिदास पाटील श्री.संतोष पाटील, श्री.संजय पवार, श्री योगेंद्र राजपूत,यांनी यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्याची भूमिका निभावली .सर्व वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!