अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा मतदार संघात उमेदवारी साठी अपक्ष उमेदवार म्हणून प्रा प्रतिभा पाटील यांनी अर्ज भरला.
स्व कष्टातून स्वराज्य निर्माण करण्याचा मानस असलेले तथा उलटी फिटिंग – सूलटी फिटिंग सारख्या कार्यक्रमातून जनतेत प्रबोधन करणारे आर बी पाटील उर्फ कोको कोला सर यांच्या अर्धांग्नी प्रा.सौ प्रतिभा रवींद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला.त्यांचेही समाजकार्य खूप मोठे आहे. उदाहरणार्थ उलटे फिटिंग कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे, वृद्धाश्रम,अनाथाश्रम, बाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, वृक्षरोपण, रक्तदान शिबिर घेणे,असे बरेच समाजकार्य त्यांनी आजपर्यंत केले आहेत. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख आहे.तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी उमेदवारी केल्याचे त्यांनी करडी नजर न्युज सोबत बोलतांना सांगितले.