अमळनेर प्रतिनिधी, येथील विधानसभा निवडणुकीत आघाडी तर्फे उमेदवारी मिळावी म्हणून तब्बल डझनभर इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडे तिकीटाची मागणी केली होती.पक्षाच्या वरिष्ठांनी इच्छुक सर्वाँना कामाला लागा म्हणून आदेश दिले होते.आदेशाचे पालन करीत मलाच उमेदवारी मिळणार या अनुषंगाने प्रचार प्रसार करायला सुरुवात केली.मतदार संघातील खेडी-पाडी पिंजून काढले. काहींनी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार यंत्रणा राबविण्यासाठी आर्थिक बाबींचा चुराडा सुध्दा केल्याचे आढळून आले.
आघाडीची जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार याकडे इच्छुकासह तालुक्याचे लक्ष लागून होते.इच्छुकांनी मुंबई वाऱ्या सुरू ही केल्या.मलाच तिकीट मिळणार म्हणून अनेकांनी समाजमांध्यमातून वावटळ उठविले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख येऊन कालावधी दोन दिवसात संपण्याच्या मार्गावर असताना सदरची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटली व येथील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ अनिल शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि इथेच आघाडीत बिघाडीची ठिणगी पडली.
आघाडीचे तिकीट डॉ अनिल शिंदे यांना जाहीर होताच आघाडीतील इतर इच्छुक उमेदवांरांचा नाराजीचा सूर उमटू लागला.राष्ट्रवादी सह काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांनी बंडाळी करत काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यात काँग्रेस पक्षाचे अमळनेर तालुका अध्यक्ष बी के सुर्यवंशी,शहर अध्यक्ष मनोज पाटील यांनी इच्छुक उमेदवार के डी पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उघड उघड काँग्रेस पक्षा सोबत बंडाळी केली.यामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले.यामुळे एकनिष्ठ असलेले काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंडाळी करणाऱ्या वर पक्षाने शिस्त भंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ काढून टाकण्याची मागणी वरिष्ठा कडे केल्याचे समजते.राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आदरणीय शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा चुराडा केल्याची चर्चा या बंडाळी मुळे झाल्याची भावना आघाडीतील कार्यकर्त्या मध्ये होतांना दिसत आहे.
पक्ष श्रेष्ठी या बंडखोर इच्छुकावर काय कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.