अमळनेर येथील तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताच्या पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
काँग्रेस चे वरिष्ठ नेते मुन्ना शर्मा यांच्या वाड्यात सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी स्वर्गवासी इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल यांच्या फोटोला अंमळनेर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार व राष्ट्रवादी ग्रंथालय सेल काँग्रेसचे उमेश भैय्या पाटील यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले तर शिवसेनेचे युवानेते पराग पाटील यांच्या हस्ते माल्यारपण करण्यात आले.
या वेळी डॉ. अनिल शिंदे यांच्या शहरात प्रचारा बाबत विचारविनिमय करण्यात आले व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले की, डॉ अनिल शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देण्याबाबत सर्वांनी एकमत दर्शविले व इंदिराजी आणि लोहपुरुष यांच्या प्रतिमे समोर तशी शपथ घेतली .
या प्रसंगी मुन्नाभाई शर्मा, एड.रज्जाबाई शेख,प्रवीण जैन, राजू फापोरेकर, जाकीर शेख, जुबेर पठाण,समाधान धनगर, ताहीर शेख,शब्बीर भाई,गणेश गुप्ता, गणेश चौधरी, प्रभाकर लांडगे, साबीर पठाण आदी कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते.