पाच दिवस उलटूनही उत्तर काही सुचेना-असेल हिंमत तर द्या उत्तर…प्रताप शिंपी यांचे आवाहन
अमळनेर येथील अनेक दिवस गुलदस्त्यात ठेवलेला सूतगिरणीचा महाघोटाळा मंत्री अनिल पाटील यांनी बाहेर काढताच चौधरी बंधूंची जणुकाही दातखिळीच बसली असून आरोप होऊन पाच दिवस उलटले असताना उत्तर काही सुचत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी केला आहे.
खरोखरच चौधरी बंधुमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भूमिपुत्र अनिल दादा पाटील यांचे आव्हान स्वीकारून उत्तर देण्यासाठी चौकात यावे असे आव्हान देखील शिंपी यांनी दिले आहे.
यात म्हटले आहे की महायुतीच्या मेळाव्यात दिनांक 11 रोजी भूमिपुत्र अनिल दादा पाटील यांनी चौधरी बंधूंचा सूतगिरणीचा महा घोटाळा बाहेर काढुन चौधरी बंधूनी शासकीय भाग भांडवल पोटी आलेले 18 कोटी 20 लाख 25 हजार कसे लंपास केलेत याचा संपूर्ण लेखा जोखा पुराव्यानिशी चित्र फीत दाखवत चौधरी बंधूंचा काळा करनामा जनतेसमोर आणला होता,आणि खोटं असेल तर चौकात येऊन उत्तर द्या असे आवाहन देखील केले होते. ही चित्र फीत सोशल मीडियावर संपूर्ण मतदारसंघात व्हायरल होऊन सर्वत्र या कारनाम्याची चर्चा झाली,जणू काही चौधरी बंधूंचे खरे रूपच जनतेसमोर आले.
यावर चौधरी बंधूंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुरवातीला आम्हीही त्यांचे घोटाळे बाहेर काढू असे बालिश पणाचे उत्तर दिले होते आणि हे उत्तर समाधानकारक नसल्याने शासनाचे पैसे कुठेही गेले नसून दोन दिवसात पुराव्यांनिशी उत्तर देऊ असे सांगून वेळ मारून नेली होती.
त्यानंतर यासंदर्भात अनेक वृत्त पत्रात ठळक बातम्या प्रकाशित झाल्या,सोशल मीडियावर देखील याची खूप चर्चा झाली,एवढेच नव्हे तर गावात व ग्रामीण भागात एका गृप कडून या घोटाळ्याचे फलक ही लागून गावोगावी पत्रक देखील वाटले गेले मात्र एवढे आरोप होत असताना आणि आरोप होऊन पाच दिवस उलटले असताना चौधरी बंधूंना याचे ऊत्तर काही सुचत नसल्याने या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट असून निवडणुकीनंतर मंत्री अनिल दादा पाटील शासनाच्या वतीने याचा हिशोब तर नक्कीच घेणार आहेत.आपला घोटाळ्यापासुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांच्यावर कितीही लहान मोठे आरोप केलेत तरी जनता विश्वास ठेवणार नसल्याचे शिंपी यांनी म्हटले आहे.