अमळनेर येथील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करणारे अपक्ष उमेदवार शिवाजी दौलत पाटील यांना मतदारांनी भरगोस मत देऊन विजयी करण्याचे आवाहन डॉ रुपेश संचेती यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
सामाजीक कार्यकर्ते तथा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आम आदमी पक्षाचे माजी पदाधिकारी डॉ रुपेश संचेती यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणारे शिवाजी पाटील यांना ग्रामीण भागातील शेतकरी चांगले मानतात, शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन केले.वेळ प्रसंगी त्यांना जेल मध्ये जावे लागले,स्वखर्चाने आंदोलन चालवत असतात,त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांची चांगली प्रतिमा आहे. ते निवडून आल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले आजी माजी सह आघाडीचे उमेदवार हे न्याय देऊ शकत नाहीत म्हणून मतदारांनी चांगल्या व्यक्तीला अर्थात शिवाजी पाटील यांना निवडून द्यावे,नुसते शिवाजी पाटील चांगला व्यक्ती आहे,असे बोलून चालणार नाही तर त्यांना आमदार बनवले पाहिजे,असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.