अमळनेर येथील कलाध्यापक संघा मार्फत पुरस्कार प्राप्त कला शिक्षकांना मंगल देव ग्रह मंदिर या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.
विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी कला शिक्षक सन्मानित…..
जेष्ठ निवृत्त कला,शिक्षक मार्तंड ओमकार शेलकर यांना राज्यस्तरीय कलाशिक्षक संघटने चा जीवनगौरव पुरस्काराने घोषित झाला होता.त्याच प्रमाणे लोकमान्य शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षक मनोहर महाजन यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत इतर जबाबदारी सांभाळून कला क्षेत्रात विशेष कामगिरी बद्दल राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने पंढरपुर अधिवेशनात सन्मानित करण्यात आले आहे.सेंट मेरी हायस्कूल चे कला शिक्षक दिलीप पाटील यांना देखील एस पी मेमोरियल ट्रस्ट मुंबई छत्रपती महा वंदन आव्हाड 2025 ने सन्मानित करण्यात आले होते.
या कला शिक्षकांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे अमळनेर शहराचे नाव देखील लौकिक झाले आहे.याच कारणास्तव अमळनेर कलाध्यापक संघा मार्फत शहरातील मंगल ग्रह देव मंदिराचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी कलाध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कंखरे,सचिव दिनेश पालवे,मार्तंड शेलकर,मनोहर महाजन,दिलीप पाटील,जिल्हा संघटनेचे आर डी. चौधरी,विकास शेलकर,सूर्यकांत निकम,अनिल पाटील,अशोक पाटील, आर.एन.पाटील, बी.एस.पाटील,दीपक वाघ,वसंत सुर्यवंशी,सर्जेराव पाटील,विलास पाटील आदी सर्व कलाध्यापक शिक्षक उपस्थित होते.