अमळनेर,उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दैनिक लोकमत वृत्तपत्रामार्फत WOMEN ACHIEVERS AWARD – 2025 हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात अमळनेर येथी ल सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना पाटील यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या मान्यवरांची लाभली उपस्थिती….
भव्य सोहळा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, मराठी चित्रपट अभिनेत्री मीरा जगन्नाथ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डॉ. केतकी पाटील, किरण बच्छाव व लोकमतचे मुख्य संपादक किरण अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे कार्य: सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या सौ. स्वप्ना पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. महिलांचे सबलीकरण, शिक्षणविषयक जनजागृती, आरोग्यसेवा, तसेच गरजूंसाठी विविध मदतकार्ये त्यांनी सातत्याने केली आहेत
या सन्मानामुळे संपूर्ण अंमलनेर परिसरात आनंदाचे वातावरन निर्माण झाले असून, त्यांच्या चाहत्यांसह परिवार, मित्रमंडळी व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!