विद्यार्थ्यांसाठी ताण व्यवस्थापन तंत्र : योग ” या विषयावर व्याख्यान संपन्न
अमळनेर : प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, RUSA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग विभागाच्या प्रा.डॉ.लिना मनिष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अतिशय शाश्त्रशुद्ध आणि मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले.यावेळी तारुण्यातले अर्थात युवा अवस्थेतील खूप प्रश्नांची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
सदर समारंभासाठी विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख श्री.डॉ.राजेश इच्छाराम पाटील (डेप्युटी इंजिनीअर ) उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन, उप-प्राचार्य डॉ.कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे यांच्यासह जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप नेरकर (सिनेट सदस्य ), डॉ. मुकेश भोळे(IQAC समन्वयक), प्रा.वृषाली वाकडे,डॉ.एस डी बागुल,डॉ.एस एम राजपूत, डॉ.संतोष दिपके, डॉ. हेमंत पवार, डॉ.प्रियंका पाटील, प्रा.अर्चना पाटील, प्रशांत भाऊ देवकाते व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियांका पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ.एस एम राजपूत यांनी केले.तर प्रास्ताविक वरिष्ठ जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप नेरकर यांनी केले तर आभाराचे कार्य क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील यांनी पार पाडले.