अमळनेर येथील निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी आपली उमेदवारी ही शेतकरी व कष्टकरी यांच्या साठीच असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्त असे की,अमळनेर विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.काल रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की माझी लहान पणा पासून आमदार होण्याची इच्छा आहे. वडीला सोबत कष्ट करत आहेत.जशी समज आली अगदी तेव्हां पासून शेतकऱ्या साठी आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे.प्रसंगी पोलिसांचा मार सुध्दा खाल्ला आहे.जेल मध्ये गेलो आहे.कष्टकरी कामगार यांच्या करीता उपोषण केले.विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याने त्यांना चांगले संस्कार व्हावे म्हणून मी प्रबोधन करीत असतो.बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून तालुक्यात तीन ठिकाणी औद्यगिक क्षेत्र उभारणार आहे. मारवड येथे साखर कारखाना,जानवे मंगरूळ येथे अहिल्याबाई यांच्या नावाने सुत गिरणी,रत्नापिप्री येथे तंट्या भिल नावे सूतगिरणी, महात्मा फुले यांच्या नावाने पातोंडा येथे स्टार्च मका फॅक्टरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमळनेर मध्ये मेडिकल कॉलेज तर गांधली पिलोदे येथे बायोडिजल प्रकल्प व भोकरबारी धरण परिसरात एमआयडीसी उभारणार असल्याने सुज्ञ मतदारांनी चांगलां विचार करून मला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उतुंग कार्य करणारे सेवाभावी वृत्तीचे डॉ रुपेश संचेती हे उपस्थित होते.